भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे जगदंबा माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्वच्छ भारत अभियान देशभक्तीपर गीत ऐतिहासिक नाटकांसोबतच विविध गाण्यांवर चिमुकल्यांनी नृत्याविष्कार सादर करत पाहुण्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रारंभ पासून सादर होणाऱ्या विविध संस्कृतीवर आधारित तविष्कार आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांतून दर्शवण्यात आलेली राष्ट्रीय एकात्मता असे जल्लोष मी वातावरणात जगदंबा विद्यालयाचे स्नेहसंमेलन बघायला तुडुंब गर्दी जमली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माध्य.सो.संचालक बाबासाहेब बोडके संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, वैशालीताई कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, ज्ञानदेव बेरड, हबीब शेख, उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बाबासाहेब बोडखे यांनी शालेय स्तरावरील उपक्रमांचे कौतुक करत मुलांना मार्गशन केले. वैशाली सचिन कोतकर यांनी शुभेच्छा देत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्याचबरोबर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विभागीय जिल्हास्तरावर मिळवले यशाचे कौतुक बक्षीस व पारितोषिक वितरण करून करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर यांनी प्रास्ताविक केले अशोक हराळ यांनी आभार मानले सविता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले