SAMSUNG Galaxy A73 5G: Flipkart Mobile Bonanza Sale सुरू झाला आहे. हा सेल 9 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. म्हणजे व्हॅलेंटाईनमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत (flipkart electronics device offer). या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर भन्नाट ऑफर्स उपलब्ध आहेत. अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोनही निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. सॅमसंगने आपला वॉटरप्रूफ स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन चांगलाच लोकप्रिय झाला. SAMSUNG Galaxy A73 5G असे या फोनचे नाव आहे. फोनची किंमत जवळपास 50 हजार रुपये असली तरी ती अगदी स्वस्तात मिळू शकते. कसं ते सांगत
SAMSUNG Galaxy A73 5G Offers & Discounts
SAMSUNG Galaxy A73 5G ची लाँच किंमत 47,490 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 41,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर ५४९१ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यानंतर अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर्स आहेत, ज्यामुळे फोनची किंमत अजून कमी होईल.
SAMSUNG Galaxy A73 5G Bank Offers
SAMSUNG Galaxy A73 5G खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड Hdfc Bank Credit Card वापरत असाल तर तुम्हाला २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यानंतर फोनची किंमत ३९,९९९ रुपये होईल.
SAMSUNG Galaxy A73 5G Exchange Offer
SAMSUNG Galaxy A73 5G वर २२,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला एवढी ऑफर मिळू शकते. पण तुमचा जुना फोन सुस्थितीत असेल आणि मॉडेल लेटेस्ट असेल तरच तुम्हाला २२,००० रुपयांची पूर्ण सूट मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळवण्यात यशस्वी झालात तर फोनची किंमत 17,999 रुपये असेल.
SAMSUNG Galaxy A73 5G Specs
SAMSUNG Galaxy A73 5G डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला ६.७ इंचाचा एफएचडी + सुपर एमोलेड + इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आणि १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळेल. गॅलेक्सी ए७३ ५जीमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. गॅलेक्सी ए७३ ५जीमध्ये ५,० एमएएचची जबरदस्त बॅटरी मिळते, जी २५ वॉट सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.