ताज्या बातम्याफुकटमध्ये हॉंगकॉंगला फिरायला जाण्याची संधी, विमानासाठी मोफत तिकिटे, असा घ्या लाभ

फुकटमध्ये हॉंगकॉंगला फिरायला जाण्याची संधी, विमानासाठी मोफत तिकिटे, असा घ्या लाभ

spot_img
spot_img

अनेकांना परदेशात फिरण्याची हौस असते. अनेकांना ही हौस पैशांच्या बजेटमूळ पूर्ण करता येत नाही. दरम्यान आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला अगदी फ्रीमध्ये परदेश प्रवास करता येईल. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण हे खरं आहे. खरतर हाँगकाँगच्या पर्यटन विभागाकडून पर्यटकांना त्यांच्या देशात आमंत्रित करण्यासाठी खास ऑफर दिली जात आहे.

प्रवाशांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर दिले जाणार आहे. हाँगकाँगच्या पर्यटन मंत्रालयाने ‘हॅलो, हाँगकाँग’ नावाची खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफरअंतर्गत 5 लाख प्रवाशांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर दिले जाणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात

हाँगकाँगच्या नेत्याने दिलेली माहिती पहा
मध्यंतरी कोरोनामुळे हाँगकाँगमधील पर्यटनावर परिणाम झाला हे. आता यातून बाहेर येण्यासाठी हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी गुरुवारी ही खास ऑफर सुरू केली. ही ऑफर मार्चमध्ये 80,000 तिकिटांसह सुरू होईल. एअरलाइन्स कॅथे पॅसिफिक, हाँगकाँग एक्सप्रेस आणि हाँगकाँग एअरलाइन्स 1 मार्चपासून सहा महिन्यांसाठी परदेशी अभ्यागतांना विनामूल्य विमान तिकिटे वितरित करणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या ऑफरचा लाभ कसा घ्यावा
हाँगकाँगच्या फ्रेड लॅम टिन-फूकच्या म्हणण्यानुसार, मोफत तिकिटांचा लाभ घेण्यासाठी पर्यटक हाँगकाँगस्थित एअरलाइन्स कॅथे पॅसिफिक, एचके एक्सप्रेस आणि हाँगकाँग एअरलाइन्सच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात. 2022 मध्ये केवळ 6 लाख पर्यटक हाँगकाँगला गेले होते, जे 2018 च्या आकडेवारीच्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. गेल्या तीन वर्षांत 130 हून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हाँगकाँगस्थित कार्यालये बंद केली आहेत.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात