लाईफस्टाईलWhatsApp चालवण्याचा 'अंदाज' बदलणार, येतोय 'हा' भन्नाट ऑप्शन

WhatsApp चालवण्याचा ‘अंदाज’ बदलणार, येतोय ‘हा’ भन्नाट ऑप्शन

spot_img
spot_img

येत्या काही वर्षांत WhatsApp वर अनेक फीचर्स रोलआऊट केले जाणार आहेत. काही बीटा टेस्टर्ससाठी आले आहेत तर काही अंडर डेवलपिंग आहेत. युजर्सच्या आयओएस आणि अँड्रॉइड बीटावर मेसेज गायब होण्यापासून रोखण्यासाठी WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सचा अनुभव तर वाढेलच, शिवाय चॅटिंगची पद्धतही बदलणार आहे. चला जाणून घेऊया या फिचरबद्दल…

कीप ऑप्शन मिळेल
Wabetainfo च्या रिपोर्टनुसार प्ले स्टोअर आणि टेस्ट फ्लाइट अँपवरून अँपचे लेटेस्ट बीटा व्हर्जन इन्स्टॉल केल्यानंतर काही बीटा टेस्टर्ससाठी हे फीचर रोलआउट करण्यात आले आहे. नवीन फीचरमुळे आता बीटा टेस्टर्स कीप पर्यायाचा वापर करून काही गायब होणारे मेसेज सेव्ह करू शकतात. चॅट बबलमध्ये ठेवलेले संदेश बुकमार्क आयकॉनसह चिन्हांकित केले जातात आणि ते ठेवलेल्या संदेश विभागात देखील सूचीबद्ध केले जातात.

याशिवाय संभाषणात गुंतलेले युजर्स या फीचर्सवर नियंत्रण ठेवू शकतील. अनकीप ऑप्शनचा वापर करून यूजर्स चॅटमधील संदेश डिलीट करू शकतात, तथापि, ग्रुप एडमिन यानच कीप ऑप्शन मिळू शकेल. हे ऑप्शन सध्या काही बीटा टेस्टर्सकडे उपलब्ध आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी यूजर्स साठी रोलआउट होण्याची अपेक्षा आहे, असे अहवालात म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात