महाराष्ट्रघडामोडींना अचानक वेग ! शिंदे, फडणवीस अमित शहांची बैठक;पंकजा मुंडेंही रवाना,विखे पाटील..

घडामोडींना अचानक वेग ! शिंदे, फडणवीस अमित शहांची बैठक;पंकजा मुंडेंही रवाना,विखे पाटील..

spot_img
spot_img

सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. महाराष्ट्रमध्ये अनेक घडामोडी सुरु आहेत.दरम्यान आता राजकीय घडामोडींमबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार आहे.

विशेष म्हणजे या बैठकीला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde, राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil सुद्धा हजर राहणार असल्याचे एका रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. सध्या भाजपानेत्या पंकजाताई नाराज आल्याचे बोलण्यात येत असल्यानं ही भेट महत्वाची मानली जात आहे. कारण या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्ह आहेत.

त्यामुळे आता या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. नॉर्थ ब्लॉकमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Home Minister Amit Shah यांच्या कार्यालयात बैठक होणार असून या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या बैठकीच्या वृत्ताने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

परंतु ही बैठक राज्यातील नवीन सहकारी कायदा, मल्टी स्टेट बँक आणि कारखान्यासंदर्भातील नवीन कायदा,साखर उद्याग,कापूस प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग, इथेनॉल धोरण, मासेमारी, आजारी कारखाने आदी मुद्यावर चर्चा करण्यासाठी असल्याची शक्यता आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात