महाराष्ट्रातील राजकारण सर्वश्रुत आहे. भाजप-शिवसेना यांमध्ये निर्माण झालेली राजकीय कटुता देखील सर्वांसमोर आहे. परंतु आता एक मोठा गौप्यस्फोट उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मला अटक करण्याचं टार्गेट दिल गेलं होत अस वक्तव्य केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला तुरुंगात टाकण्याचं टार्गेत तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं गेलं होतं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एका प्रसिद्ध वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी काही गोष्टी समोर मांडल्या. यावेळी त्यांना विचारण्यात आले की,
उद्धव ठाकरेंसोबतच्या राजकीय वैरामुळे वैयक्तिक मैत्री देखील संपुष्टात आलीय का? याबाबत बोलत असताना फडणवीसांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. मी कधीच राजकीय वैर मनात ठेवत नाही. उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असं टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते”, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा विविध चर्चाना उधाण आले आहे.