आपल्या महाराष्ट्रामध्ये मंदिरांची संख्या खूप जास्त आहे. मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. आजही अशी अनेक मंदिरे आहेत की ज्याची अशी रहस्ये पाहून शास्त्रज्ञही अवाक होतात. काहींची रहस्ये अजूनही उलगडलेली नाहीत. असेच एक मंदिर आहे की जेथे अद्भुत चमत्कार पहायला मिळतो.
हे मंदिर आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर याठिकाणी. हेमाडपंथीय वास्तुकलेत हे मंदिर बांधले आहे. मंदिरातील बहुतांशी मूर्ती पुरातत्त्व खात्याने बांधलेल्या संग्रहालयात आहेत. संग्रहालयातील काही मूर्तींवर हात फिरवला अथवा टिचकी मारल्यास सप्तसूर निघतात. होय हे खरे आहे. या मूर्तींवर आत फिरवल्यास सात स्वर निघतात.
कधी झाली मंदिराची स्थापना?
शिलालेखात दिलेल्या माहिती नुसार इ.स. (1271 ते 1310) या ठिकाणच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे आढळून येते. या मंदिराचा जीर्णोद्धार बाईदेवराणा यांनी केला असा उल्लेख येथील शिलालेखात आढळतो. मराठी आणि संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखांत देवराणा यांच्या नावाचा उल्लेख आहे.
मंदिरासमोरच पाण्याचे एक मोठे कुंड आहे. बाराही महिने यामध्ये पाणी असते.
अर्धनारी नटेश्वर ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते.