आज सर्वत्र विविध चॅनलचा, ते पाहण्याचा ट्रेंड आहे. चॅनल पाहण्यासाठी आपल्याकडे सेट ऑफ बॉक्स असणे आवश्यक आहे. तसेच त्याचा रिचार्जही. परंतु जर तुम्हाला सांगितले की, सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्ही चॅनेल्स पाहू शकता, तर? पण हे खरे आहे.
आता भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ही योजना देणार आहे. कंपनीने ने एक जबरदस्त इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन IPTV सेवा आणली आहे. यामध्ये 1000 हून अधिक टीव्ही चॅनेल ऑफर केले जातील असे म्हटले आहे. परंतु यासाठी महत्वाचे म्हणजे ब्रॉडबँड कनेक्शन असणे आवश्यक आहे.
त्यामुळे आता बीएसएनएल ब्रॉडबँड ग्राहकांना वेगळे टीव्ही आणि ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागणार नाही. इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन ही एक ऑनलाइन सेवा आहे. यासह, वापरकर्ते त्यांच्या टीव्ही किंवा स्मार्टफोनवर सामग्री आणि थेट टीव्ही स्ट्रीम करू शकतात. बीएसएनएलच्या बाबतीत, ही सेवा उल्का टीव्ही अंतर्गत दिली जाईल. यासाठी उल्का टीव्ही अॅप आहे जे टीव्ही किंवा स्मार्टफोनवर डाउनलोड केले जाऊ शकते.