लाईफस्टाईलValentine day Love Story: ४८ वर्ष तो पाहतच राहिला वाट 'तिची' अन्...

Valentine day Love Story: ४८ वर्ष तो पाहतच राहिला वाट ‘तिची’ अन् ती आलीच नाही,वाचा ही खरी प्रेमकहाणी

spot_img
spot_img

तू हो पुढे, मी येतेच….रात्रीच जेवण सोबत करूया हे शब्द आहे. त्या प्रियासीचे…जी कधी आलीच नाही. पण म्हणतात ना, प्रेम… प्रेम असत, कधी कधी प्रेम माणसाच्या जिवंत मृत शरीराला जगणं शिकवत तर कधी जगणाऱ्या जिवंत माणसाला मृत बनवत. प्रेमात माणूस काय काय करू शकेल याचा अंदाज बांधणं अशक्य. प्रेमाचे अनेक दाखले देता येतील, त्यातील अग्रेसर असणारे नाव म्हणजे ताजमहाल… मात्र आपल्या हृदयालाच ताजमहाल बनवत खऱ्या प्रेमाची साक्ष दिली ती महाराष्ट्रातील एका अवलियाने..

तर ही कहाणी आहे तब्बल 48 वर्ष आपल्या प्रियसीची वाट पाहणाऱ्या एका महान प्रेमवीराची. चाळीसगाव शहरात रेल्वे स्टेशनला लागून असलेली एका दगडी इमारतिच्या भिंती आजही त्याच आतुरतेने वाट पाहतेय त्या प्रियसीची. कारण याच भिंती साक्षी आहेत त्या प्रेमवीराच्या, ज्याने तब्बल 48 वर्ष स्वतःला याच भिंतीआड कैद करत खऱ्या प्रेमाची व्याख्या या जगासमोर मांडली.

केकी मूस हे मुंबईत आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यात असले तरी त्याची मूळ चाळीसगावात. मुंबई येथे असतानाच के. की. मूस यांचे एका मुलीवर प्रेम जडले. ही मुलगी कोण ? तिचं नाव काय ? ती मूळची कुठली ? के.की. आणि ह्या मुली ची भेट झाली कुठे व कशी झाली, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे के.की. मूस यांच्या निधनानंतर इतिहास जमा झालीत. हे प्रश्न अजूनही निरुत्तरित आहे. मात्र त्यांचा जीवन प्रवास प्रेमाची अनेक उत्तरे देऊन जातो.

के. की. मुंबई सोडून कायमचे चाळीसगावात यायला निघाले, आयुष्यभर सोबत राहण्याची वचन घेऊन सोबत तीही मुंबईच्या रेल्वेस्थानका पर्यंत के. की. यांच्या सोबत आली खरी, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. स्थानकावर चाळीसगाव कडे येणारी गाडी येऊन उभी राहिली मात्र ती त्या गाडीत बसण्याच्या ऐवजी के. की. तू हो पुढे मी येतेच मागच्या पंजाब मेल या गाडीने, आपण सोबत रात्रीच जेवण करू असे सांगत तिने के.की. यांचा हात सोडला तो कायमचाच..

आपल्या प्रेयसीवर नितांत विश्वास टाकत के.की. हे चाळीसगाव आले. ती येईल आणि रात्रीचे जेवण सोबत घेऊन पुढील आयुष्यही सोबत काढू या विश्वासात के. की. तीची वाट पाहत होते. त्या रात्री पंजाब मेल चाळीसगाव रेल्वे स्थानकावर येऊन थांबला खरा मात्र त्या गाडीतून ती आलीच नाही. के की मात्र तिच्या आठवणीत, ती येईल या आशेवर, आपल्या प्रेमाची वाट पाहत….पुढील तब्बल ४८ वर्ष रोज रात्री पंजाब मेल येई पर्यंत आपल्या घराचे दार खिडक्या उघडुन तिच्या स्वागतासाठी सज्ज असायचे.अनेक चेहरे या गाडीतून उचारायचे मात्र केकी यांना अपेक्षित असणारा चेहरा कधी या गाडीतून ह्या स्थानकावर उतारालाच नाही.

पंजाब मेल रोज नित्य नेमाने यायचा आणि निघूनही जायचा. ती मात्र कधी आलीच नाही. तिने सांगितल्या प्रमाणे सोबत जेवण करू ह्या आशेवर के. की. रोज पंजाब मेल येण्याची वाट पाहत बसायचे आजही ती आली नाही ही खात्री झाली की मगच ते स्वतः जेवण करायचे. दुसऱ्या दिवशी मात्र पुन्हा तीच पंजाब मेल,…तेच उगडे दार, खिडक्या तिच्या स्वागतासाठी असायच्या…..ती आता येणार नाही हे माहीत असूनही… ४८ वर्ष तो पाहतच राहिला वाट तिची”,….. अन् ती आलीच नाही..

के. की. यांनी मात्र स्वतःला आत्मकैद करत आपल्या कलेच्या माध्यमातून भिंतीआड उभारल ते जगविख्यात कलादालन…प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी असा अनमोल ठेवा या वास्तूत दडला आहे. के.की. यांच्या निधनानंतर आजही ही वास्तू संस्थेचे विश्वस्त सचिव कमलाकर सामंत हे सांभाळत आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात