सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तप्त झाले आहे. भाजप-शिवसेना यानात चाललेला राजकीयवाद, शिंदे गटाची केली आणि आता यातच सत्यजित तांबे यांच्या पदवीधर वरून चाललेला घोळ यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
असे असतानाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांमध्ये झालेल्या गुप्तचर्चेने उधाण आले आहे. तीन चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडला निघालेले असताना शिर्डी विमानतळावर आले होते. तेथे काही वेळ त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाजूला जाऊन चर्चा केली. अन याच चर्चेने नंतर राजकीय चर्चाना उधाण आले.
या चर्चेचा तपशील समजला नसला तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही यासंबधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान फडणवीस व विखे या दोघांनी बाजूला जाऊन काही काळ चर्चा केली त्यांची नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.
सत्यजीत तांबे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा दिला आहे. मात्र तांबे यांना अद्याप भाजपने पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसचाही अंतिम निर्णय झाला नाही आणि तांबे यांनीही भाजपकडे अद्याप अधिकृतरित्या पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे भाजपचा काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत फडणवीस यांनी विखे पाटील यांचे मत जाणून घेतल्याचे सांगण्यात येते.