सध्या महाराष्ट्रातील चाललेलं राजकारण सर्वश्रुत आहे. आज भीमशक्ती-शिवशक्तीच्या युतीची घोषणा करण्यात आली. एकीकडे हे सुरु असतानाच दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चांगलंच फटकारलं आहे.
‘आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युउत्तर आल्याचं सांगण्यात येत आहे. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी जागावाटपावरून अजित पवार यांना फटकारलं.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, आता या पुढे वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान असेल. शेवटी कुणी किती जागा लढायच्या हे अजून ठरवायचे आहे. ते ठरल्यानंतर निर्णय घेऊ. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आम्ही एकमेकांना मदत केली. त्यामुळे नागपूरला सुद्धा अर्ज भरला होता तो मागे घेतला. नाशिकची जागा काँग्रेसला जागा सोडली. त्याने जे करायचं नाही ते केलं.
अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकली त्यांना सोडली होती. पण आमचा माणूस नाही असं म्हटलं नाही. आता सामजस्याचं राजकारण यापुढे करायचे नसेल, तर मला असं वाटतं एकत्र येण्याचे नाटक कुणी करू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रत्युउत्तर दिलं.