आर्थिकइलेक्ट्रिक कारवर स्वस्त कर्ज मिळणार ? मंत्री नितीन गडकरींच्या या निर्णयाने बसेल...

इलेक्ट्रिक कारवर स्वस्त कर्ज मिळणार ? मंत्री नितीन गडकरींच्या या निर्णयाने बसेल सर्वांनाच धक्का

spot_img
spot_img

Electric Vehicle : गेल्या काही वर्षांत देशात इलेक्ट्रिक कारची Electric Car मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी Electric Two Wheeler आणि तीनचाकी वाहनांचा या सेगमेंटमध्ये दबदबा असला तरी पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्येही ग्राहकांच्या आवडीकडे कल वाढत आहे. टाटा मोटर्स सध्या देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक कार ची विक्री करणारी कंपनी आहे. याशिवाय एमजी मोटर्स (mg motors), किया इंडिया (Kia India) आणि ह्युंदाई Hyundai देखील यात हात आजमावत आहेत. मर्सिडीज Mercedes, बीएमडब्ल्यू BMW आणि जग्वार सारख्या कंपन्यांनीही भारतात आपल्या ईव्हीची विक्री सुरू केली आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त असल्याने अनेक ग्राहक इच्छा असूनही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत नाहीत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना धक्का बसू शकतो. गडकरी यांनी संसदेत सांगितले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बँकांना इलेक्ट्रिक वाहनांवर स्वस्त कर्ज देण्यासारखा कोणताही सल्ला दिलेला नाही. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी बँकांना स्वस्त व्याजदरात कर्ज देण्याचा सल्ला देण्याचा मंत्रालयाचा विचार आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे विधान केले.

सरकार आपल्या FAME योजनेअंतर्गत सबसिडी देऊन इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. मात्र त्यानंतरही भारतात इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांच्या वरच आहे. यामुळेच इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी स्वस्त व्याजदराची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. अशा तऱ्हेने गडकरींचे हे वक्तव्य अनेक ग्राहकांना निराश करू शकते.

अर्थसंकल्पात मिळाले गिफ्ट
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 ची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024 साठी फेम-2 योजनेअंतर्गत अंदाजे 51.72 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय भारतात ईव्ही बॅटरी बनवण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या आयातीवरील सीमाशुल्क हटवण्याचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील ईव्हीच्या किमती कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात