महाराष्ट्रतुफान स्पीडमध्ये चालणार तुमचे इंटरनेट, सरकारने आणला नवीन नियम

तुफान स्पीडमध्ये चालणार तुमचे इंटरनेट, सरकारने आणला नवीन नियम

spot_img
spot_img

Broadband Connection Internet Speed: इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे त्रस्त झालेल्या युजर्सना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीची व्याख्या बदलली आहे आणि उच्च किमान डाउनलोड स्पीड 2 एमबीपीएस पर्यंत वाढविला आहे. म्हणजेच आता युजर्सला कमीत कमी 2 मेगाबिट्स प्रति सेकंद डाऊनलोड स्पीड मिळणार आहे.

या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यवधी युजर्सना होणार असून त्यांना जलद गतीने इंटरनेटचा Fast Internet वापर करता येणार आहे. या अगोदर डाउनलोड स्पीड कमीत कमी ५१२ केबीपीएस होता

१८ जुलै २०१३ च्या अधिसूचनेने जारी केलेली ब्रॉडबँडची व्याख्या बदलण्यासाठी आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) शिफारशींचा विचार करण्यासाठी केंद्र सरकार ब्रॉडबँडच्या व्याख्येत पुढीलप्रमाणे सुधारणा करते.

ब्रॉडबँडची व्याख्या सरकारने बदलली
“ब्रॉडबँड एक डेटा कनेक्शन आहे जे इंटरनेट अॅक्सेससह इंटरॅक्टिव्ह सेवांना समर्थन देऊ शकते आणि सेवा प्रदात्याच्या पॉईंट ऑफ प्रेझेंस (पीओपी) वरून वैयक्तिक ग्राहकाला किमान 2 एमबीपीएस डाउनलोड स्पीड प्रदान करण्याची क्षमता आहे,” असे अधिसूचनेत म्हटले आहे. 30 नोव्हेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार, भारतात 82.5 दशलक्ष ब्रॉडबँड वापरकर्ते आहेत, त्यापैकी 79.3 दशलक्ष वापरकर्ते वायरलेस ब्रॉडबँड कनेक्शन वापरतात.

भारतातील टॉप ५ ब्रॉडबँड कंपन्या
नोव्हेंबर २०२२ अखेरीस टॉप पाच सर्व्हिस प्रोव्हायडर्सनी एकूण ब्रॉडबँड वापरकर्त्यांपैकी ९८.४% मार्केट शेअर काबीज केला. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (४३ कोटी युजर्स), भारती एअरटेल (२३ कोटी युजर्स), व्होडाफोन आयडिया (१२.३ कोटी युजर्स), बीएसएनएल (२.५ कोटी युजर्स) आणि अॅट्रिया कन्व्हर्जन्स (२१ लाख युजर्स) या भारतातील टॉप ५ सर्व्हिस प्रोव्हायडर्सचा समावेश आहे.

ट्रायने केली होती शिफारस
ऑगस्ट 2021 मध्ये ट्रायने शिफारस केली होती की ” ब्रॉडबँडच्या व्याख्येचा आढावा घेण्यात आला आहे आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीसाठी किमान डाउनलोड स्पीड सध्याच्या 512 केबीपीएसवरून 2 एमबीपीएस पर्यंत वाढविण्यात आला आहे. डाउनलोड स्पीडच्या आधारे फिक्स्ड ब्रॉडबँडची बेसिक, फास्ट आणि सुपर फास्ट अशा तीन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

Speedtest Global Index: भारताची मोठी झेप
डिसेंबर 2022 महिन्यासाठी ओकलाच्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार, भारताने सरासरी 25.29 एमबीपीएस मोबाइल डाउनलोड स्पीड नोंदविला, जो नोव्हेंबर 2022 मधील 18.26 एमबीपीएसपेक्षा चांगला आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात